पाचोराराजकारण

पाचोऱ्यात शिवसेनेला पुन्हा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । पाचोरा येथे शिवसेनेला पुन्हा आणखी एल धक्का बसला आहे. भाजपाने पाचोरा शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्र.०४ व ०५ मध्येच सुरुंग लावला असून येथील सर्वच्या सर्व कट्टर शिवसैनिक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला आहे.

याबाबत असे की, भाजपाने एका पाठो-पाठ एक शिवसेनेला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. पाचोरा ग्रामीणसह आता शहरात देखील शिवसेनेला गळती लागली आहे. नुकत्याच एकमेव पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला होता.

गेल्या काही दिवसांपासून शहरात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत असताना आता प्रत्यक्षात भाजपाने पाचोरा शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्र.०४ व ०५ मध्येच सुरुंग लावला. येथील सर्वच्या सर्व कट्टर शिवसैनिक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाच्या अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

यावेळी त्यांच्याशी चर्चा केली असता शिवसेनेमधील वाढती घुसमटता व आमदार किशोर पाटील हे जनतेचे व कार्यकर्त्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यात असमर्थ ठरत असल्याचे सांगून शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करत असल्याचे त्यांनी सांगितले.

भव्य असा प्रवेश सोहळा घेणार- अमोल शिंदे 

ही तर सुरुवात असून येणाऱ्या काळांत शिवसेना व राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडेल तसेच प्रवेश केलेल्या सर्वांचा भाजपात योग्य तो सन्मान राखून लवकरच शहरांतील महत्वाच्या जबाबदाऱ्या देखील दिल्या जातील आणि येणाऱ्या काळांत पाचोरा व भडगाव दोघे तालुके मिळुन भव्य असा प्रवेश सोहळा मा.मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात होईल असे परत एकदा अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी डॉ.भुषण मगर,भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी, विकास वाघ (गोटू शेठ),सरचिटणीस दिपक माने, भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे, राहुल गायकवाड, टिपू देशमुख, विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, समाधान पाटील, हरीश पाटील आदी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button