बातम्या

एरंडोल येथे नथ्थू बापूंना पांडव नगरी उत्सव समितीतर्फे भगवी चादर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । एरंडोल येथील पीर नथ्थु बापू मिंया यांच्या उर्स निमित्त पांडव नगरी उत्सव समितीतर्फे भगवी चादर चढविण्यात आली. यावेळी पांडव वाड्यापासून तर दर्गा पर्यंत युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षी २९ नोव्हेंबर पासून नथ्थू बापूंचा उरूस भरत असतो. यावर्षी कुस्ती व कव्वालीचा कार्यक्रम कोरोनामूळे परवानगी नसल्याने रद्द करण्यात आला होता. तसेच  मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे उरूस भरविण्यात आला नव्हता. यावर्षी कोरोना नियमांचे पालन करून उरूस भरविण्यास प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी पांडवनगरी सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने नथ्थू बापुंना भगवी चादर चढविण्यात येते. तसेच मिरवणुकीत असंख्य तरुण सहभागी झाले होते. मिरवणुकीत युवकांच्या हातातील श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र असलेले भगवे ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

यांच्या हस्ते भगवी चादर चढविण्यात आली.

समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेनेचे शहरप्रमुख अतुल आनंदा चौधरी (भगत), सामाजिक कार्यकर्ते गोरख चौधरी, परेश बिर्ला, प्रशांत महाजन यांच्याहस्ते नथ्थू बापुंना भगवी चादर चढविण्यात आली.

यांची होती उपस्थिती 

यावेळी पंच कमिटीचे माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनार कृष्णा ओतारी, भूषण चौधरी, नितीन बोरसे, मयूर बिर्ला, मुन्ना महाले, राजेश शिंपी, दिनेश महाजन, उमेश साळी, प्रकाश पाटील, आकाश महाजन, मयूर मोहन महाजन, यश झांबरे, पवन साडी, नितीन महाजन, किरण लोहार, तुषार सोनार, राहुल ठाकूर, सिद्धार्थ परदेशी, यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button