जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२१ । शहरासह जिल्ह्यात रेमेडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे असे म्हणता येणार नाही. रेमेडीसीवर इंजेक्शन एमआरपी दराने विक्री केले जात होते. इंजेक्शनची मुदत संपण्यात आल्याने कंपन्यांनी किमती कमी केल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपत आम्ही ना नफा, ना तोटा दराने विक्री करण्याचा निर्णय १९ मार्च रोजी घेतला आहे.
खाजगी रुग्णालयांशी जोडलेले काही मेडिकल चालक जादा दराने इंजेक्शनची विक्री करीत असल्याची माहिती आली असून याबाबत जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केलेली असल्याची माहिती जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी ‘जळगाव लाईव्ह न्यूज’शी बोलताना दिली.