रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी सहायक पोलिस निरीक्षकांनी काढला असा तोडगा, सर्वत्र काैतुक
जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ डिसेंबर २०२१ । अडावद पोलिस स्टेशनच्या हद्दीत आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आहेत. या विद्यार्थिनींना अनेकदा रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागतो. या समस्यांवर बचाव करण्यासाठी येथील पोलिस निरीक्षकांनी पिंक बॉक्स लावण्याचा हा अनोखा तोडगा काढला असून, याची सुरुवात नूतन ज्ञान मंदिर शाळेपासून करण्यात आली आहे. हा पिंक बॉक्स परिसरातील सर्व शाळांमध्ये लावला जाणार आहे. त्यामुळे आता थेट विद्यार्थीनीना रोडरोमिओंची तक्रार पिंक बॉक्सद्वारे करता येणार असून, घरून शाळेत जाताना, शाळेबाहेर किंवा कुठेही रोडरोमिओ त्रास देत असेल, तर विद्यार्थिनींनी त्याची माहिती कागदावर लिहून आपली तक्रार पिंक बॉक्समध्ये टाकावी, तसेच संबंधित रोडरोमिओचे नाव माहीत असेल किंवा नसेल तरी विद्यार्थिनींना तक्रार करता येईल. असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अडावद पाेलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
गरज भासल्यास कारवाई करणार
पिंक बॉक्समध्ये तक्रार प्राप्त झाल्यास ही बाब रोडरोमिओच्या पालकांच्या लक्षात आणून दिली जाईल. त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्यास तसेच कायदेशीर कारवाईची गरज भासल्यास ती केली जाईल. पिंक बॉक्सच्या माध्यमातून सावित्रींच्या लेकींना शाळा-महाविद्यालयासह गावात निर्भीडपणे वावरता येईल, असे सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनी सांगितले.
प्रसाधनगृहात बसवणार बॉक्स
संबंधित रोडरोमिओचे नाव माहीत असेल किंवा नसेल तरी विद्यार्थिनींना तक्रार करता येईल. संबंधिताकडे दुचाकी असल्यास त्याच्या दुचाकी क्रमांकही, त्याचे वर्णन, छेडखानीचे ठिकाण देता येईल. विद्यार्थिनींना गुप्तपणे तक्रार करता यावी, यासाठी पिंक बॉक्स शाळेतील मुलींच्या प्रसाधनगृहात बसवले जातील. तसेच या उपक्रमाचा दुरुपयोग होऊ नये, याचीही काळजी पोलिसांकडून घेतली जाणार आहे.
छेडखानीचे प्रकार घडतात. अशा रोडरोमिओंची तक्रार विद्यार्थीनीना पिंक बॉक्सद्वारे करता येईल. घरून शाळेत जाताना, शाळेबाहेर किंवा कुठेही रोडरोमिओ त्रास देत असेल, तर विद्यार्थिनींनी त्याची माहिती कागदावर लिहून आपली तक्रार पिंक बॉक्समध्ये टाकावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अडावद पाेलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात अाहे.