जळगाव जिल्हाजळगाव शहर

जळगावच्या युवकाची उंच भरारी ; नौदलात झाला सबलेफ्टनंट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ ।  शहरातील रहिवासी अथर्व अनिल भोकरे हा युवक नौदलात सबलेफ्टनंट झाला असून, शनिवारी इंडियन नेव्ही अकॅडमी परेडमध्ये सहभागी झाला. त्याचा राष्ट्रपती कमिशन व शिपिंग सबलेफ्टनंट स्ट्राइप्सने सन्मान करण्यात आला. ही एकूण ८ हजार मुलांमध्ये ३७१ मुलांची निवड झाली. त्यात अथर्व आहे.

अथर्वने सन २०१४ मध्ये इयत्ता नववीत सातारा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतलेला होता. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होत असताना एनडीए व आयएनएच्या परीक्षा दिल्या. आएनएमध्ये त्याची निवडही झाली होती. एनडीए पुणे हे त्याचे लक्ष्य असल्याने खडतर परिश्रम केले. लेखी, शारीरिक चाचणीत तो उत्तीर्ण झाला. ३ किलो वजन जास्त भरल्यामुळे त्याने फेरचाचणी दिली. त्यासाठी केवळ २१ दिवसांमध्ये ५ किलो वजन कमी करून सक्षमता सिद्ध केली. एकूण ८ हजार मुलांमध्ये ३७१ मुलांची निवड झाली. त्यात अथर्व आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button