गुन्हेयावल

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । माहेरून पैसे आणावे म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी नाशिक येथील सासरच्या मंडळींविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसमाशेख मोहम्मद नदीम (वय-२९, रा. वडाळा, नाशिक, ह.मु. गंगानगर, यावल) यांचा विवाह २०१३ साली नाशिक येथील मोहम्मद नदीम समसोद्दिन शेख यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर पती मोहम्मद नदीम याने विवाहितेला फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी केली. त्यानुसार विवाहितेच्या आई-वडिलांनी फ्लॅट घेण्यासाठी पैसे दिले. त्यानंतर तोच प्लॅट गहाण ठेवून पती मोहम्मद नदीम याने पुन्हा भाड्याचे घर घेण्यासाठी वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानंतर विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर पतीसह सासू सासरे नणंद, फुवा आणि चुलत दीर यांनी २३ नोव्हेंबर रोजी विवाहितेच्या यावल येथील घरी येऊन शिवीगाळ केली.

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पती मोहम्मद नदीम समसोद्दिन शेख, सासरे समसोद्दिन अल्लाउद्दीन शेख, सासू यास्मिनबी समसोद्दिन शेख, दिर आजीम शेख समसोद्दिन शेख, नणंद अंजुमनबी निसार शेख, फुवा मुक्तार शेख, शफिक शेख आणि चुलतदीर जुबेर शेख हुसेन खान (सर्व रा. नाशिक) यांच्याविरोधात दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल असलम खान दिलावरखान करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button