जळगाव जिल्हायावल
यावल पंचायत समिती गटविकास अधिकारीपदी मंजुश्री गायकवाड
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । यावल पंचायत समितीच्चा गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांनी पदभार स्विकारले आहे.
यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांची कळवण नाशिक येथे बदली झाली असून, त्यांच्या रिक्त असलेल्या पदावर काही काळ भुसावळचे गट विकास अधिकारी विलास भाटकर यांच्याकडे प्रभारी गटविकास अधिकारी पद सोपविण्यात आले होते .
आता मराठवाड्यातील उस्मानाबादचे मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांचे माहेर असुन, धुळे त्यांचे सासर आहे. त्यांनी सोलापूर व पंढरपूर येथून आपल्या प्रशासकीय सेवाकार्यची सुरुवात केली असुन, जळगाव पंचायत समितीच्चा गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी तीन वर्ष सेवा केली आहे.
कायम स्वरूपी गटविकास अधिकारी मिळाल्याने यावल तालुक्यातील ग्रामिण क्षेत्रात विविध विकास कामांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .