⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | भिलपुरा चौक ते रेल्वे पूल रस्ता घेणार मोकळा श्वास !

भिलपुरा चौक ते रेल्वे पूल रस्ता घेणार मोकळा श्वास !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२१जळगाव शहरातील भिलपुरा चौक ते रेल्वे पूल ममुराबाद नाका रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे रस्त्यावर उतरले आहे. शुक्रवारी तात्पुरते अतिक्रमण आणि टपऱ्या हटविण्यात आल्या असून पक्के अतिक्रमण हटविण्यासाठी रहिवाशांना ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.

कोरोनातून बाहेर पडलेले उपायुक्त संतोष वाहुळे यांनी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा लावला आहे. शुक्रवारी सुभाष चौक ते शनीपेठपर्यंत असलेल्या हॉकर्सवर कारवाई करताना ते शनिमंदिर परिसरात पोहचले.

भिलपुरा चौक ते ममुराबाद रेल्वे पुलापर्यंत मोठ्याप्रमाणात अतिक्रमण असल्याचे दिसून आल्याने मनपाने कारवाई केली. मुख्य रस्त्यावरील टपऱ्या हटविण्यात आल्या असून पक्के अतिक्रमण हटविण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.

 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.