जळगाव जिल्हारावेर
निंभोरा येथे अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवीले
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । निंभोरा ( ता. रावेर ) येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फियादीवरून निंभोरा पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ वर्षीय मुलगी ही कुटुंबीयांसह राहते. २१ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलील अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे उघडकीला आले आहे. यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास कोल्हे करीत आहे.