⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जिल्हा बँकेसाठी ९४.८ टक्के मतदान

जिल्हा बँकेसाठी ९४.८ टक्के मतदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २० नोव्हेंबर २०२१ | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी रविवार दि.२१ रोजी जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण मतदानापैकी ९४.८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक १०० टक्के मुक्ताईनगर तालुक्यात तर सर्वात कमी ८८.५९ टक्के मतदान यावल तालुक्यात झाले. उद्या सोमवार दि.२२ रोजी मतमोजणी होणार आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांच्या जागेसाठी रविवार दि.२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यासाठी प्रत्येक तालुक्यावर एक मतदान केंद्र ठेण्यात आले होते. जळगाव तालुक्यासाठी जळगाव शहरातील सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल, भुसावळ येथील जामनेर रोडवरील म्युनिसीपल हायस्कूल, यावल येथील जिल्हा परीषद प्राथमिक मुलीची शाळा, रावेर येथील सौ. कमलाबाई एस. अगरवाल गर्ल्स हायस्कुल व मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील जे.ई. स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बोदवड येथील जिल्हा परीषद मुलींची शाळा नं.१, जामनेर येथे न्यु इंग्लिश स्कूल, पाचोरा येथील श्री. गो.से. हायस्कूल, भडगाव येथील सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. जयश्री गणेश पुर्णपात्री कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, चाळीसगाव येथील हिरुभाई हिमाभाई पटेल प्राथमिक विद्यालय व अन्नपूर्णाबाई पाटसकर बालक मंदीर, पारोळा येथील एन.ई.एस. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथील जि.एस. हायस्कुल, चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मराठी शाळा व एरंडोल येथील आर. टी. काबरे विद्यालय आदी केंद्रात मतदान घेण्यात आले.

अशी आहे तालुकानिहाय टक्केवारी
जळगाव तालुक्यात ९१.५०, भुसावळ तालुक्यात ९६.४०, यावल तालुक्यात ८८.५९, रावेर तालुक्यात ९४.००, मुक्ताईनगर तालुक्यात १००.००, बोदवड तालुक्यात ९८.३३, जामनेर तालुक्यात ९०.३४, पाचोरा तालुक्यात ९३.९९, भडगाव तालुक्यात ९९.२२, चाळीसगाव तालुक्यात ९६.१७, पारोळा तालुक्यात ९३.३०, अमळनेर तालुक्यात ९५.७०, चोपडा तालुक्यात ९९.०७, धरणगाव तालुक्यात ९६.३८ व एरंडोल तालुक्यात ९४.५५ टक्के मतदान झाले.

बँकेच्या सभागृहात मतमोजणी
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मंगळवार दि.२२ रोजी जेडीसीसी बँकेच्या गणेश कॉलनीतील सभागृहात मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.