जळगाव जिल्हा

जिल्ह्यातील कलावंतांना कामे द्यावी; कला पथकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कला पथकांना कामे मिळावी, अशी मागणी कला पथकांकडून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दि.१४ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील दहा संस्थांच्या कला पथकांची निवड करण्यात आली. परंतु, अद्यापपर्यंत या पथकांना कार्यक्रम मिळालेले नाहीत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून कलावंतांचे काम बंद आहे. त्यामुळे काही कला पथकांच्या कलाकारांवर उपासमारी व मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
उदरनिर्वाहासाठी कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांबद्दल मला सहानुभूती आहे. निवड करण्यात आलेल्या संस्थेतील कलाकारांना त्वरीत कार्यक्रम देऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी राऊत यांनी यावेळी दिले. निवेदन देतेवेळी समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे विशाल जाधव, तुळजाई बहुउद्देशीय संस्थेचे भूषण लाडवंजारी, संवेदना बहुउद्देशीय संस्थेचे दीपक पाटील, बबन जोगी, बापू जोगी, अशोक जोगी, स्वप्नरंग बहुउद्देशीय संस्थेचे महेश राठी, जयंत चव्हाण आदी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button