विवरे शिक्षण मंडळाच्या चेअरमनपदी धनजी लढे
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । विवरे ( ता. रावेर ) येथील विवरे शिक्षण विकास मंडळाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक, संस्थेचे संस्थापक कै. मुरलीधर अवसू राणे यांचे सुपुत्र तथा जे.टी.महाजन तंत्रनिकेतन कॉलेजचे प्राचार्य प्रदीप राणे यांच्या प्रयत्नांनी बिनविरोध झाली. शिक्षण विकास मंडळ संचलित श्री ग. गो. बेंडाळे हायस्कूल चेअरमनपदी धनजी लढे, व्हा. चेअरमन रामचंद्र देशमुख तर सलग चौथ्यांदा सचिवपदी शैलेश राणे यांची निवड झाली.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व्हा. चेअरमन, सचिव तसेच संचालक मंडळ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित संचालक मंडळाचे माजी खासदार तथा संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, जे.टी. महाजन तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रदीप राणे, मुख्याध्यापक ए. जी. महाजन, हर्षाली बेंडाळे ग.स. संचालिका कल्पना पाटिल, दिलीप पाटिल, माजी सरपंच वासुदेव नरवाडे, पर्यवेक्षक पदमाकर वायकोळे, शरद येवले, अर्जून साळुंखे, किशोर पाटील, नरहरी पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केले. सूत्रसंचालन पूनम पाचपांडे यांनी केले, तर कुमुदिनी भंगाळे यांनी आभार मानले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्ष मार्तंड भिरूड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीला उपाध्यक्ष मनोहर राणे, चेअरमन धनजी लढे, व्हा चेअरमन रामचंद्र देशमुख, सचिव प्रा. शैलेश राणे, संचालक रमेश पाचपांडे, वसंत राणे, गोपाळ राणे, किरण पाचपांडे, केशव राणे, दिलीप राणे, विद्या राणे, रवींद्र भिरुड व संचालक मंडळ उपस्थित होते.
वाटाघाटी अशा
प्रारंभीच्या काळात चेअरमन धनजी लढे, सचिव प्रा. शैलेश राणे यांना पहिले अडीच वर्ष कार्यभार मिळेल. तर पुढील अडीच वर्षात चेअरमन प्रा. शैलेश राणे, व्हाईस चेअरमन गोपाळ राणे व सचिवपदी केशव राणे, वसंत राणे असतील.