जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । जिल्ह्यातील कोरोनाचा विस्फोट सुरू आहे. आज दिवसभरात तब्बल ११८३ नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या २४ तासांत १३ जणांचा बळी गेला. हे दोन्ही आकडे या टप्प्यातील विक्रमी व धडकी भरविणारे आहेत.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता आलेख चिंता वाढविणारा आहे. साधारण महिनाभरापासून संसर्ग वाढताच आहे. सातत्याने आकडा वाढत असून संपुर्ण जिल्हाच आता हॉटस्पॉट बनला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ८१ हजार ९६९ झाली आहे. त्यात एकूण ६९ हजार ९७६ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्टिव्ह रूग्णांचा आकडा देखील वाढत असून सद्यस्थितीत १० हजार ४५४ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज पुन्हा जिल्ह्यात १3 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १ हजार ५३९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर २७४, जळगाव तालुका-१२; भुसावळ १४३, अमळनेर- ८८; चोपडा- १९५; पाचोरा १५; भडगाव १०; धरणगाव ६९; यावल ३२; एरंडोल १२२ जामनेर ४१; रावेर ३६, पारोळा ४८; चाळीसगाव २८; मुक्ताईनगर ४७; बोदवड-२१ आणि इतर जिल्ह्यातील ०२ असे ११८३ रूग्ण आढळून आले आहेत.