निंभोऱ्यात २ घरफोड्या, ग्रामस्थांना जाग येताच चोरट्यांनी काढला पळ
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । निंभोरा येथील बस स्थानक परिसरातील दाेन बंद घरे फाेडून अज्ञात चोरट्यांनी काही ऐवज लंपास केला. मात्र, झाेपेतून जागे झालेल्या ग्रामस्थांनी हटकताच या चाेरट्यांनी पळ काढल्याची घटना १२ रोजी मध्यरात्री घडली.
सविस्तर असे की, पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी १२ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास निंभोरा बस स्थानक परिसरात असलेल्या ओम जनरल स्टोअर शेजारील व सध्या पुणे येथे गेलेल्या धीरज ढाके व नाशिक येथे लग्नानिमित्त गेलेल्या सविता मनुचारी यांच्या बंद घरांचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला. यात धीरज ढाके यांच्या घरातील कपाटाचे सामान अस्ताव्यस्त करून चांदीचा काही ऐवज त्यांनी लंपास केला. मात्र, परत जाताना त्यांना ग्रामस्थ कमलाकर येवले यांनी काय आहे रे असे म्हणत हटकले. पाच ते सहा संख्येने असलेले चाेरटे येवले यांच्यावर चालून आले. मात्र, त्या परिसरातील इतर ग्रामस्थही जागे झाले.आणि सर्वांनी आवाज दिल्याने चोरट्यांना पळ काढण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
यांनी पाहणी केली
सकाळी याबाबत पाेलिस उपनिरीक्षक काशिनाथ कोळंबे, पाेलिस काॅन्स्टेबल एस.आर. सूर्यवंशी यांनी पाहणी केली.