जळगाव जिल्हाजळगाव शहर

दिवाळीनंतर मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना ‘नो रूम’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ ।  जळगाव गेल्या आठवड्यात दिवाळीमुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी होती, तर आता दिवाळी आटोपल्यानंतर जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. यामुळे आठ ते नऊ सुपरफास्ट गाड्यांना जागा शिल्लक नसल्यामुळे ‘नो रूम देण्यात आला आहे. दरम्यान, गर्दीमुळे डब्यांमध्ये जागा मिळत नसल्यामुळे प्रवासी दिव्यांग बांधवांच्या डब्यांमध्येही घुसखोरी करत आहेत.

दिवाळीआधीच मुंबई-पुण्याकडून येणाऱ्या अनेक गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले होते. आता दिवाळीनंतरही जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना तीच परिस्थिती आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबर रोजीच्या जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांना जागेअभावी ‘नो रूम दाखविण्यात आले आहे. यामुळे आहे. प्रवाशांना संबंधित गाड्यांचे वेटिंग तिकीट मिळणे अशक्य झाले आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने अद्यापही तिकीट मिळणे अशक्य झाले पॅसेंजर सुरू केल्या नसून, जनरल तिकीट देणेही सुरू केलेले नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या गाड्यांना प्रचंड गर्दी दिसून येत आहे.

मुंबईकडे जाणाऱ्या या गाड्यांना ‘नो रूम’

गीतांजली एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, प्रवाशांची घुसखोरी,

प्रवाशांची घुसखोरी 

दिव्यांग बांधवांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे प्रत्येक एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र दिव्यांग डबा उपलब्ध करून दिला आहे. या डब्यांमध्ये दिव्यांग बांधवांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, जनरल बोगींमध्ये जागा मिळत नसल्यामुळे प्रवासी दिव्यांग बांधवांच्या डब्यांतून प्रवास करीत आहेत. यामुळे दिव्यांग बांधव प्रवाशांची अडचण होत असून, या प्रवाशांवर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे, रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

जनरल बोगी गर्दीने खचाखच

रेल्वे प्रशासनाने कोरोनामुळे सध्याच्या जनरल बोगींनाही आरक्षित केले आहे. जनरल तिकीट बंद असल्यामुळे, या बोगीसाठी आरक्षित तिकीट उपलब्ध करून दिले आहे. मात्र, आरक्षित डबे असले तरी, जनरल बोगी म्हणूनच प्रवासी या डब्यांमधून प्रवास करत आहेत. परंतु, क्षमतेपेक्षा या बोगींमध्ये तिप्पट प्रवासी बसून प्रचंड गर्दी होत आहे. या सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडत आहे.

 

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button