⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | २२ वर्षांनी रंगले स्नेहसंमेलन, शिक्षकांची फेटा घालून काढली मिरवणूक

२२ वर्षांनी रंगले स्नेहसंमेलन, शिक्षकांची फेटा घालून काढली मिरवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । जैतपीर ( ता. अमळनेर ) येथेही माध्यमिक विद्यालयाचे बावीस वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांबद्दल एक आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केली. २२ वर्षांनी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांनाबद्दल भेटून व कृतज्ञता व्यक्त करण्याची नियोजनपूर्वक अनेक विद्यार्थ्यांची ८ महिन्यांपासून संपर्क करत अपूर्व भेट घडून आणली.

जैतपीर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. टी. गिरासे तर अतिथी रूपात स्कूल कमिटीचे चेअरमन अजबसिंह राजपूत, व्हाईस चेअरमन विश्राम बागुल व गावातील शिक्षणप्रेमी शिक्षक हजर होते. सूत्रसंचालन माजी विद्यार्थी किरण सोनवणे यांनी केले. प्रारंभी दीप प्रज्वलन करुन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षकांना फेटे बांधत गावात सवाद्य नेऊन त्यांच्या केलेल्या कृतीची उजळणी करून त्यांच्या ऋणाची उतराई म्हणून विचारातून कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक व विद्यार्थी यांच्या भेटीने आनंदाश्रू दोन्हींच्या नयनात विराजमान झाले होते. अध्यक्ष गिरासे यांचा सपत्नीक माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला. शिक्षक पी. एस. विंचूरकर, शमीर पठाण, जी. एस. पाटील, ईश्वर महाजन, सुशील चौधरी, अभय जैन, एम. एन. पाटील, संजय चौधरी व कर्मचारी विनोद पाटील, लालसिंग राजपूत, रमेश पाटील यांचा माजी विद्यार्थ्यांनी शाल, श्रीफळ, पुष्पहार, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. शाळेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यांचे सहकार्य लाभले 

कार्यक्रमासाठी अरुण पाटील, रवींद्र पाटील, विनोद पाटील, किरण पाटील, भागवत सैंदाणे, प्रवीण मोरे, किरण सोनवणे, दिनेश बागुल, शरद खैरनार, विजय शिंदे, विनोद कुळकर्णी, दीपक पाटील, दिलीप बागुल यासह अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

यांची उपस्थिती होती 

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, जैतपीर शाळेतील शिक्षक उपस्थित होते. अरुण पाटील यांनी आभार मानले.

दरम्यान, ऋणाची उतराई म्हणून विचारातून कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक व विद्यार्थी यांच्या भेटीने आनंदाश्रू दोन्हींच्या नयनात विराजमान झाले होते. अध्यक्ष गिरासे यांचा सपत्नीक माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला. शिक्षक पी. एस. विंचूरकर, शमीर पठाण, जी. एस. पाटील, ईश्वर महाजन, सुशील चौधरी, अभय जैन, एम. एन. पाटील, संजय चौधरी व कर्मचारी विनोद पाटील, लालसिंग राजपूत, रमेश पाटील यांचा माजी विद्यार्थ्यांनी शाल, श्रीफळ, पुष्पहार, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. शाळेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

शिक्षकांनी सादर केली गाणी

सोहळ्यात केक कापून माजी विद्यार्थी व शिक्षकांनी गाणी म्हणत आनंदाेत्सव साजरा केला. माजी विद्यार्थी व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या अध्यापन व शिस्तीबाबत गौरवोद्गार काढले. अध्यक्षीय भाषणात गिरासे म्हणाले की, आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मिळालेले यश व आपण ज्या पदावर कार्यरत आहात ते पुढच्या पिढीला प्रेरणादायी राहिल, असे त्यांनी सांगितले. तर पी. एस. विंचुरकर, शमीर पठाण, सुशील चौधरी, जे. एस. पाटील यांनी, माजी विद्यार्थ्यांनी आमचा सत्कार केला, हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे सांगितले.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.