⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | वाणिज्य | सोने पुन्हा उच्चांकाच्या दिशेने, चांदीच्या दरातही मोठी वाढ

सोने पुन्हा उच्चांकाच्या दिशेने, चांदीच्या दरातही मोठी वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । लग्न सोहळ्यांना लवकरच सुरुवात होणार त्यामुळे लग्न सोहळ्यासाठी सोनं खरेदी करायचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण गेल्या ४ दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी देखील सोन्याच्या दरात ३७० रुपयांनी तर चांदीच्या दरात १ हजार ११० रुपयांनी वाढ झाली.

सणासुदीचा काळात मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे ५८० रुपयाची वाढ झाल्याने सोन्याने ५० हजाराचा टप्पा गाठला होता. तर चांदी प्रति किलो १३४० रुपयांनी वाढले होते. दरम्यान, शुक्रवारी देखील सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. ३७० रुपयांनी सोन्याचे दर वाढल्याने जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ५० हजार ३७० रुपयांवर पोहोचला होता. तर चांदीच्या दरातही १ हजार ११० रुपयांनी वाढ झाल्याने चांदीचे दर प्रति किलोसाठी ६८ हजार ५३० पर्यंत पोहोचले होते.

आणखी भाव वाढ होण्याची शक्यता
दिवाळीच्या आगोदर सोन्याच्या दरात काहीशी घसरण झालेली दिसून आली होती तर चांदीच्या दरात चढ-उतार सुरु होता. मात्र दिवाळीत सोन्याची मागणी वाढल्याने दरात सतत वाढ होताना दिसून येत आहे. आंतराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने आणि चांदीचे भाव वाढत आहे, असे  व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, २० नोव्हेंबरपासून लग्नांचा धुमधडाका सुरु होणार आहे. त्यामुळे सोने-चांदीची मागणी वाढणार आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दरात मोठी होणार होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.