विहिरीतून पाणी काढताना तोल गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील ४८ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. सुखदेव हिलाल पाटील (वय ४८) असे मृताचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तारखेडा येथील सुखदेव पाटील यांची शेतजमीन आहे. सुखदेव पाटील हे ७ रोजी सकाळी ८.३० वाजता शेतात गेले होते. दुपारी त्यांना पाण्याची तहान लागली असता ते नजीकच्या धना भावडू अहिरे यांच्या शेतातील विहिरीतून पाणी काढत हाेते. या वेळी त्यांचा तोल जावून ते विहिरीत पडले.
विहिरीत पाणी जास्त असल्याने सुखदेव पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, सुखदेव पाटील घरी न अाल्याने पत्नी व मुलाने गावात त्यांचा सर्वत्र शोध घेतला. याचवेळी धना अहिरे यांच्या शेतातील विहिरीजवळ सुखदेव पाटील यांचे बूट दिसल्याने विहिरीत शोध घेतला असता सुखदेव पाटील यांचा मृतदेह आढळून आला. तपास पोलिस नाईक सूर्यकांत नाईक करत आहेत.