⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, जळगाव गटातून महापौरांची उमेदवारी निश्चित

जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, जळगाव गटातून महापौरांची उमेदवारी निश्चित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात अजिंठा विश्रामगृह येथे महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्यूला निश्चित झाला असून जळगाव तालुका विकास गटाची जागा शिवसेनेला सुटलेली आहे. जळगावची जागा शिवसेनेच्या वाटेला आल्याने महापौर जयश्री महाजन यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढत आहेत. आघाडीच्या पारड्यात अगोदरच ६ जागा बिनविरोध मिळाल्या असून उर्वरित १५ जागेंसाठी खरी लढत होण्याची शक्यता आहे. भाजप एकाकी पडल्यानंतर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी अजिंठा विश्रामगृहात गेल्या आठवड्यात महत्वाची बैठक झाली. बैठकीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार, आ.शिरीष चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ.सतिष पाटील, जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष ऍड.रोहिणी खडसे, उपाध्यक्ष आ.किशोर पाटील आदी उपस्थित होते.

दोन जागेंचा प्रश्न सोडला तर बैठकीत जागा वाटप निश्चित झाले होते. त्यात जळगाव तालुका विकास गटाची जागा शिवसेनेला सुटली आहे. जळगाव तालुका विकास गटातून सुशिक्षित उमेदवार महापौर जयश्री महाजन यांनी अर्ज दाखल केला असून त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा ताळमेळ जमला तर जिल्हा बँकेत महापौर जयश्री महाजन यांची वर्णी लागेल हे निश्चित आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.