जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ नोव्हेंबर २०२१ । यंदाच्या दिवाळी सणानिमित्त सोन्याच्या मागणीत चांगलीच वाढ दिसून आली. सोन्याच्या या वाढत्या मागणीमुळे येत्या काळात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून त्यामुळे या दिवाळीत सोनं तुलनेन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. दरम्यान, आज जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये सोन्याचा २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,६०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदी ६५,५०० रुपये प्रति किलो इतका आहे.
मागील गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. गेल्या महिन्यात सोन्याच्या भावात जवळपास १५०० ते १६०० रुपयाची वाढ झालीय. तर दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. गेल्या महिन्यात चांदीच्या भावात ५५०० हजार रुपयाची वाढ झालीय.
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने धनत्रयोदशीला सोने व चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा अपूर्व उत्साह पाहायला मिळाला. काल मंगळवारी धनत्रयाेदशीला सुवर्णनगरी जळगावात किमान ३५ ते ४० काेटींची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकार व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
गतवर्षीपेक्षा दर कमी
सराफ बाजारात नेहमी चढउतार पाहण्यास मिळत असतात. सोन्याचे दर सातत्याने वाढत असतात. यंदा मात्र चित्र उलटे असून सोन्याचे दर कमी झाले आहेत. याउलट गतवर्षी जळगाव सुवर्णबाजारात सोन्याचे दर ५१ हजाराच्या वर पोहचले होते. यंदा मात्र ते खाली आले असून ४८ हजार ५०० रूपयांपर्यंत आले आहेत. यामुळे खरेदीचा मुहूर्त साधला जात आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत आता 2500 हजारांनी घसरले दर –
जळगाव सराफ बाजारात गेल्यावर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२० मध्ये सोन्याचे दर ५१ हजार २०० रुपये इतका होता. मात्र, यावर्षी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४९ हजाराच्या घरात आहे. म्हणजेच १२ महिन्यांच्या कालावधीतील घसरणीचा ट्रेंड लक्षात घेतला, तर सोने सुमारे 2500 रुपयांनी कमी झाले आहे.