⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | पेट्रोल ५ रुपयाने तर डिझेल १० रुपयाने स्वस्त ; वाचा आजचा जळगावातील दर

पेट्रोल ५ रुपयाने तर डिझेल १० रुपयाने स्वस्त ; वाचा आजचा जळगावातील दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ नोव्हेंबर २०२१ । महागाईच्या तडाख्यात सापडलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने बुधवारी सायंकाळी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली होती. पेट्रोलमध्ये पाच रुपये तर डिझेलवर १० रुपयांची कपात करण्यात आली. त्यामुळे दोन्ही इंधनाच्या किमतीत आज मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ११२ रुपयांवर आला आहे. तर डिझेल ९६ रुपयांवर आलं आहे.

गेल्या काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड वाढले आहे. देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर १२० रुपयांपर्यंत पोहोचले होते. तर डिझेल १०० रुपयांवर गेले आहे. आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे आधीच कंबरडे मोडले असताना त्यात पेट्रोलियम कंपन्यांकडून सातत्याने पेट्रोल आणि डिझेल दर वाढ होत होती. यामुळे सर्वसामान्य चिंतेत सापडला होता.

दरम्यान, महागाईच्या तडाख्यात सापडलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोठी भेट दिली आहे. सरकारने पेट्रोलवरील प्रतिलिटर अबकारी शुल्क ५ रुपये तर डिझेलवर १० रुपये घटवण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर आणखीच कमी होतील. केंद्र सरकारने राज्यांना व्हॅटमध्ये कपात करण्यास सांगितले आहे

अजूनही इंधन दरांत मोठी कपात करण्यास वाव
केंद्राने गतवर्षी ५ मे रोजी पेट्रोलवर १० रुपये प्रतिलिटर व डिझेलवर १३ रुपये अतिरिक्त अबकारी शुल्क लावले होते. यापूर्वी मार्च ते मे २०२० दरम्यान पेट्रोल व डिझेलवर ३-३ रुपयांचे अबकारी शुल्क वाढवले. मात्र कपात अनुक्रमे ५ व १० रुपयांचीच केली. म्हणजे आताही पेट्रोलवरील अबकारी शुल्क ५ व डिझेलवरचे ३ रुपयांनी घटवता येऊ शकते. यापूर्वीच्या ५ वर्षांत पेट्रोल-डिझेलवर अबकारी शुल्कात १८ रुपये प्रतिलिटरने वाढवलेले आहे.

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

केंद्र सरकारने म्हटले आहे की, पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवरील अबकारी शुल्कात दुप्पट कपात करण्यात आली आहे. यामुळे आगामी रब्बी हंगामाची तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांना विशेषकरून मोठा फायदा मिळणार आहे.

सलग ७ दिवसांपासून वाढत होते पेट्रोलचे दर
सलग ७ दिवसांपर्यंत दरवाढ झाल्यानंतर बुधवारी पेट्रोल व डिझेलच्या दरांत बदल झाला नव्हता. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर प्रत्येकी ३५-३५ पैशांनी वाढत होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.