जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । दिवाळीच्या दिवशी गणपती आणि लक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे आणि फोटोचे पूजन केले जाते. पूजेसाठी श्री गणेश आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीची खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमची दिवाळीची पूजा करणे पूर्णपणे सार्थक ठरू शकेल.
सध्या सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू झाली असून बाजारात खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली आहे. दिवाळी दिवशी लक्ष्मीपूजन करताना लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती खरेदी करणे सर्वात महत्त्वाचे आहे. श्री गणेश आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमची दिवाळीची पूजा करणे पूर्णपणे सार्थक ठरू शकेल.
चला तर मग जाणून घेऊया काही खास गोष्टी :
स्वतंत्र मूर्ती खरेदी करा – दिवाळीसाठी लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की, या दोन्ही मूर्ती एकत्रितपणे म्हणजेज एकाच आसनावर असलेल्या खरेदी करू नका. दोन्ही मूर्ती वेगवेगळ्या स्वतंत्र खरेदी करा.
बसलेल्या स्थितीत मूर्ती खरेदी करा – माता लक्ष्मी आणि श्री गणेशाची मूर्ती कधीही उभ्या स्थितीतील घेऊ नका. अशी मूर्ती विकत घेणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे दोघांच्याही मूर्ती नेहमी बसलेल्या स्थितीत असाव्यात.
मूर्ती खंडित नसावी – मूर्ती विकत घेताना हेही लक्षात ठेवा की, मूर्ती तुटलेली किंवा खंडित झालेली नसावी. भंगलेल्या मूर्तीची पूजा करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे मूर्ती नीट तपासूनच घ्यावी.
माती किंवा धातूचे शिल्प खरेदी करा – दिवाळीच्या पूजेसाठी मातीच्या मूर्तीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे नेहमी मातीची लक्ष्मी-गणेशाची मूर्ती खरेदी करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पितळ, अष्टधातू किंवा चांदीची मूर्तीही खरेदी करू शकता. शक्यतो कधीही पीओपी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा प्लास्टिकच्या मूर्ती खरेदी करू नये.
श्रीगणेश मूर्तीसोबत उंदीर असावा – गणपतीची मुर्ती अशा प्रकारे विकत घ्या की, त्याची सोंड डाव्या बाजूला असेल आणि त्याच वेळी त्याने हातात मोदक धरले आहेत. श्री गणेशजी आपल्या स्वारीवर म्हणजेच उंदरावर बसलेले असावे किंवा जर बाप्पा उंदरावर बसलेले नसतील तर त्या मूर्तीसोबत उंदीर असणे आवश्यक आहे.
लक्ष्मी माता कमळ किंवा हत्तीवर स्वार असावी – लक्ष्मी मातेची मूर्ती खरेदी करताना लक्ष्मी देवी हत्ती किंवा कमळाच्या आसनावर विराजमान असावी हे लक्षात घ्यावे. त्याचवेळी लक्ष्मी मातेच्या हातातून पैशांचा वर्षाव होत आहे, म्हणजेच त्यांच्या हातातून नाणी पडत असल्याचे पहावे.
(सूचना – या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. जळगाव लाईव्ह न्यूज याची पुष्टी करत नाही. कृपया कोणतीही माहिती अंमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा धार्मिक जाणकारांचा सल्ला घ्यावा)