⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | सात दिवस दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय, वाचा जळगावचे दर

सात दिवस दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय, वाचा जळगावचे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ नोव्हेंबर २०२१ । मागील गेली काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहे. यामुळे देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. अनेक शहरांमधील पेट्रोल दर १२० रुपयावर गेले आहे. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सात दिवस पेट्रोल दरवाढ केल्यानंतर आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नसल्याने ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे.

जळगावात आज एक लिटर पेट्रोलसाठी ११७.११ रुपये मोजावे लागत आहे. तर डिझेलसाठी १०६.१८ रुपये इतके आहे. जळगावत सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पेट्रोलचा प्रति लिटरचा दर १०८.९२ रुपये इतका होता. तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यात वाढ होऊन तो १०९.१५ प्रति लिटर पोहोचला. महिन्याभराचा विचार केल्यास पेट्रोल गेल्या एका महिन्यात ८ रुपयाने महागले आहे.

तर डिझेल १ ऑक्टोबर ला डिझेलचा प्रति लिटरचा दर ९७.५१ रुपये इतका होता. त्यात सातत्याने वाढ होत राहिली. गेल्या एका महिन्यात डिझेलच्या दरात देखील ९ रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. आधीच देशभरात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली गेली असतात त्यात सततच्या इंधन दरवाढीचा बोजा सहन करावा लागत आहे.

इतर मोठ्या शहरातील दर

आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११५.८५ रुपयावर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ११०.०४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०६.६६ रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ११०.४९ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११८.८३ रुपये असून बंगळुरात पेट्रोल ११३.९३ रुपये इतके आहे.

मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०६.६२ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ९८.४२ रुपये इतके आहे. चेन्नईत १०२.५९ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव १०१.५६ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०७.९० रुपये असून बंगळुरात डिझेल १०४.५० रुपये आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.