जळगाव जिल्हाजळगाव शहर
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ नोव्हेंबर २०२१ । आव्हाणे शिवारातील रेल्वे लाईन परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. अजय पप्पु सोनकर ( वय माहित नाही ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून येथील तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, आव्हाणे शिवारातील रेल्वे लाईन जवळील आर.एन.दुध संकलन केंद्राजवळ १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास राहत्या घराजवळून अजय पप्पु सोनकर रा. करंदा ता. मडीहान जि. मिर्झापूर उत्तरप्रदेश ह.मु. आर.एन.दुध संकलन केंद्र जळगाव याने फूस लावून पळवून नेले.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अजय सोनकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल तायडे करीत आहे.