⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | वाणिज्य | दिवाळीपूर्वी महागाईचा मोठा धक्का, गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ

दिवाळीपूर्वी महागाईचा मोठा धक्का, गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ नोव्हेंबर २०२१ । वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून दिवाळीपूर्वी जनतेला पुन्हा एकदा महागाईचा जबर फटका बसला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅसच्या दरात वाढ केली असून LPG गॅस सिलिंडरच्या दरात 266 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्येच झाली असून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे.

जळगावात विनाअनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 905 रुपये इतकी आहे. मागील गेल्या दहा महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत जवळपास 300 रुपयाची वाढ झाली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.

266 रुपयांच्या वाढीनंतर, दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 2000.5 रुपयांची वाढ झाली आहे, जी पूर्वी 1734.5 रुपये होती. तर मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी 1950 रुपये मोजावे लागणार आहेत. आता कोलकातामध्ये 19 किलोचा गॅस सिलिंडर 2073.50 रुपयांना झाला आहे, तर चेन्नईमध्ये आता 19 किलोचा सिलेंडर 2133 रुपयांना मिळणार आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही दरात वाढ करण्यात आली होती
यापूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1 सप्टेंबरला 43 रुपयांनी आणि 1 ऑक्टोबरला 75 रुपयांनी वाढली होती.

गेल्या महिन्यात घरगुती गॅसच्या दरात वाढ झाली आहे
गेल्या महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती आणि पीएसयू पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजीच्या किमतीत 15 रुपयांनी वाढ केली होती. दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत आता 899.50 रुपये आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.