गुन्हेजळगाव जिल्हा

गावठी कट्ट्यासह तरुणाच्या मोहाडी रस्त्यावर मुसक्या आवळल्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । जिल्ह्यात गावठी पिस्तुल बाळगणारे दर आठवड्याला मिळून येत आहेत. जळगाव शहरातील मोहाडी रस्त्यावर असलेल्या म्हैसवाडीजवळ एका तरुणाच्या गुरुवारी गावठी कट्ट्यासह एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या. दरम्यान, पथकाने अटक केलेला तरुण मूळ मालकाला पिस्तुल देण्यासाठी आला असल्याचे समजते.

जिल्ह्यात गँगवार आणि गोळीबारच्या घटना वाढल्यानंतर जिल्हा पोलिसांनी वॉशआउट मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाभरात ठिकठिकाणी गावठी कट्टा, चॉपर आणि धारदार शस्त्रे मिळून येत आहेत. एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मोहाडी रस्त्यावर एक तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती.

एलसीबीच्या पथकातील कर्मचारी किशोर राठोड, लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर पाटील यांच्या पथकाला तपासासाठी पाठविले. पथकाने मोहाडी रस्त्यावर फिरून विकी महेंद्र कोळी रा.समतानगर याला म्हैसवाडी परिसरातून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याचा कब्जात एक गावठी पिस्तोल मिळून आले. एलसीबीच्या पथकाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पुढील तपास आनंदसिंग पाटील करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button