आरोग्य शिबिरात २०० आदिवासी बांधवांची दंत, नेत्र तपासणी
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । मध्यप्रदेशाच्या सीमेवर सातपुड्याच्या पायथ्याशी व जळगावपासून १०० किलो मीटर दूर जाऊन चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीच्या ५ डॉक्टरांसह २५ जणांच्या टीमने देवगिरी कल्याण आश्रमाच्या सहकार्याने २०० पेक्षा अधिक आदिवासी बांधवांची दंतरोग व नेत्ररोग मोफत तपासणी करून मार्गदर्शन केले.
गरजू रुग्णांना रोटरी गोल्टसिटीतर्फे पुढील उपचार व शस्त्रक्रीया मोफत करण्यात येणार असून दुर्गम भागात वैद्यकीय सेवा मिळण्यात अनेक अडचणी येतात. म्हणुन या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती अध्यक्ष उमंग मेहता यांनी दिली. आदिवासी बांधवांची डॉ.मुलचंद उदासी, डॉ.सिमरन जुनेजा, डॉ.प्रिया पटनी, डॉ.नीरज अग्रवाल यांनी तपासणी केली. तर त्यांना वैद्यकीय टीममधील कल्पना शिंपी, युवराज पाटील, मोनाली, अनिल उदासी, कन्हैया यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास देवगिरी कल्याण आश्रमाचे आरोग्य आयाम प्रमुख साहेबराव जगताप, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भादले, जामसिंग बारेला, ॲड.अंजली कुलकर्णी, विठ्ठल मायकलवाड, निर्मला बारेला, शोभा बारेला, सूर्मी पावरा, बंसरी बारेला, वंदना पाटील, नीता बारेला, सरिता पावरा, चोपडा येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आशिष गुजराथी, प्रसन्न गुजराथी आदींचे सहकार्य लाभले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोटरी गोल्डसिटीचे अध्यक्ष उमंग मेहता, मानदसचिव डॉ.नीरज अग्रवाल, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ.सुर्यकिरण वाघण्णा, प्रकल्प प्रमुख ऋषी गुजराथी, प्रशांत कोठारी, प्रखर मेहता, राहुल कोठारी, सौरभ पटनी, निखिल चौधरी, मनीष पाटील, प्रितेश वेद, स्वप्निल पलोड, मोईज लहेरी यांनी परिश्रम घेतले.