अखेर त्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज | २५ ऑक्टोबर २०२१ । नशिराबाद गावाजवळ एका भरधाव दुचाकीस्वाराने विनय पाटील यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात तिघेजण जखमी झाले होते. दरम्यान, अपघातानंतर त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यातील एकाचा मृत्यू झाला. अनघा विनय पाटील (वय ३९, ) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विनय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धडक देणाऱ्या दुचाकीचालकाच्या विरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सविस्तर असे कि, भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्यानंतर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. या महिलेसह पती व मुलगा दुचाकीने येत असताना १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता नशिराबाद गावाजवळ हा अपघात झाला होता.
अनघा विनय पाटील (वय ३९, रा. भूषण कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. अनघा पाटील ह्या पती विनय पाटील, मुलगा कियान यांच्यासह तळवेल ( ता. भुसावळ ) येथे माहेरी गेल्या होत्या. परत येताना १२ ऑक्टोबर रोजी सकाळी नशिराबाद गावाजवळ एका भरधाव दुचाकीस्वाराने विनय पाटील यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात तिघेजण जखमी झाले होते. अनघा पाटील ह्या रस्त्यावर आढळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विनय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धडक देणाऱ्या दुचाकीचालकाच्या विरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.