रोटरी गोल्डसिटीतर्फे आयोजित शिबिरात ३५० रक्त पिशव्याचे संकलन
जळगाव लाईव्ह न्यूज | २४ ऑक्टोबर २०२१ | रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी जुलैपासून ते आजपर्यंत सहा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या सहा शिबिरातून ३५० पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष उमंग मेहता यांनी दिली.
रोटरीच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाचा बहुमान यंदा शेखर मेहता यांना मिळाला असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी इंडियाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार रोटरी गोल्डसिटीने रक्तदान सप्ताहाचे आयोजन करून तीन शिबिरांत १५० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी त्यात सहभाग घेतला. स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजमधील शिबिरात ५१ व्यक्तींनी रक्तदान केले. तेथील कर्मचाऱ्यांचे रोटरी गोल्डसिटीतर्फे हिमोग्लोबीन, ब्लड, शुगर यांची तपासणी देखील करण्यात आली. गोल्डजिम येथील शिबिराचा सह प्रांतपाल विष्णु भंगाळे यांनी रक्तदान करून शुभांरभ केला. याठिकाणी ५५ रक्तदांत्यानी सहभाग नोदंविला. श्यामनगर येथील शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले.
यशस्वीतेसाठी गोल्डसिटीचे अध्यक्ष उमंग मेहता, मानद सचिव डॉ.निरज अग्रवाल, डॉ.सुर्यकिरण वाघण्णा, प्रखर मेहता, राहूल कोठारी, रितेश वेद, प्रशांंत कोठारी, प्रवेश मुंदडा, मोईज लेहरी, स्पेट्रक्मचे संचालक दिपक चौधरी, चेतन चावरीया, शितल पाटील, छाया बडगुजर, साबिर देशपांडे, गोल्ड जिमचे संचालक राकेश सोनी, गोळवलकर रक्तपेढीचे विरभूषण पाटील, जागृती लोहार, श्रीकांत मुंडले, उदय सोनवणे, रामचंद्र पोतदार आदींनी परिश्रम घेतले.