अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लांबविला; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२१ । शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोर असलेल्या चांडक हॉस्पीटलसमोरून संतोष तुकाराम धाडी (वय-४८) यांच्या हातातील ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी धाडी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, संतोष तुकाराम धाडी (वय-४८) रा. लोणवाडी ता. जि. जळगाव हे बस चालक आहेत. लोणवाडी येथे ते आपल्या कुटुंबियांसह राहतात. २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ते चांडक हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या कन्स्ट्रक्शन समोरून पायी जात असतांना त्यांच्या मागून दुचाकीने अज्ञात तीन भामटे आले, त्यांच्या हातातील ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. यावेळी तिघांनी तोंडाला मास्क लावलेला होता.
याप्रकरणी संतोष धाडी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी करीत आहे.