जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील सुनील गायकवाड या शेकऱ्याने २३ मे रोजी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती तर लोणी बुद्रुक येथील दीपक भील यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. या दोन्ही शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा मदतीचा धनादेश आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील सुनील उत्तम गायकवाड यांनी २३ मे रोजी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. तर लोणी बुद्रुक येथील दीपक संदीप भील हे लोणीतील शिवकालीन बंधाऱ्यात बुडत असलेल्या काही तरुणांना वाचवण्यासाठी गेले होते. परंतु, तेच पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हाेता.
या दोघांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखांचा धनादेश आमदार चिमणराव पाटील, तहसीलदार अनिल गवांदे, जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी लोणी बुद्रुकचे पोलिस पाटील राजेंद्र पाटील, खुर्दचे पोलिस पाटील कौतिक पाटील, भैय्या पाटील, विनोद सैंदाणे, राजू महाले, नाना अंभोरे, वसंत केदार, रेशमाबाई गायकवाड, मीराबाई गायकवाड, उत्तम गायकवाड, जिजाबाई गायकवाड, तलाठी गौरव लांजेवार, विठ्ठल वारकर, चेतन पाटील आदी उपस्थित होते.