जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । बांभोरी प्र.चा. ता.धरणगाव येथील ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक २५ मार्च २०२१ रोजी होणार आहे. सचिन यशवंत बिऱ्हाडे हे एकमेव अनुसूचित जाती मधून लोकशाही प्रक्रियेने निवडून आलेले सदस्य आहेत. या वर्षी बांभोरी प्र.चा. ग्रामपंचायत सरपंच सोडत ही अनुसूचित जाती साठी राखीव असल्यामुळे अनु.जातीचे सचिन यशवंत बिऱ्हाडे हे एकमेव उमेदवारी अर्ज भरणार आहे.
मागील महिन्यात दिनांक १३ रोजी अर्ज भरण्याच्या दिवशी विरोधकांनी सचिन बिऱ्हाडे यांना पोलीस सरंक्षणमध्ये असून देखील त्यांच्यावर व पोलिसांवर हल्ला करून त्याचे अपहरण केले होते. यामुळे ते उमेदवारी अर्ज भरू शकले नव्हते असा आरोप त्यांनी केला आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने अँड. अभिजीत रंधे, दिपक सपकाळे, रोहन महाजन आदी उपस्थित होते.