जळगाव शहर

थकबाकी गाळेधारांना ३१ ऑक्टोबरपर्यंतचा अल्टीमेटम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । गाळे नुतनीकरणासाठी काढलेल्या आदेशात दुरूस्तीचे आश्वासन देताना थकबाकीची रक्कम भरण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले हाेते. परंतु, दाेन आठवडे उलटूनही अद्याप एकही थकबाकीदार व  गाळेधारकाने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे ३१ ऑक्टोबरपर्यंत पैसे न भरणाऱ्यांविरूद्ध जप्तीची माेहिम सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

गेल्या आठवड्यात कायद्यात बदलाच्या मागणीसाठी गाळेधारक संघटनेचे शिष्टमंडळ मुंबईला गेले हाेते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना  मागण्यांचे निवेदन दिले हाेते. मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी हे देखील व्हीडीओ काॅन्फरन्सव्दारे उपस्थित हाेते. दरम्यान, गाळेधारकांकडे पाचपट दंड वगळून सुमारे १६५ काेटींची थकबाकी असल्याचे बैठकीत आयुक्तांनी सांगीतले. त्यामुळे नगरविकास मंत्री शिंदे यांनी पैसे न भरलेल्या गाळेधारकांनी किमान २५ टक्के रक्कम जमा करावी, अशी सुचना केली हाेती.

गाळेधारकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले हाेते. मात्र, मंत्र्यांनी सुचना केल्यानंतरही अद्याप  एकही गाळेधारक पालिकेत पैसे भरण्यासाठी आलेला नाही. भरणा करण्यासाठी ३१ ऑक्टाेबरपर्यंत मुदत असून, ३१ ऑक्टोबरपर्यंत पैसे न भरणाऱ्यांविरूद्ध जप्तीची माेहिम सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button