जळगाव शहर

ऑक्टोबर ‘हिट’चा तडाखा ; आठवडाभरात तापमान पोहचले ३५ अंशांवर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । सद्यस्थितीच्या वातावरणात ऊन व पाऊस या दोन्ही बाबी एकाच वेळी निर्माण होत असल्याचे वास्तव्य आहे. एकीकडे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु तर दुसरीकडे तापमानात देखील वाढ होत आहे. जळगाव शहरात तापमान गेल्या आठवडाभरापासून ३५ अंशांवर स्थिर असून, त्यातच वातावरणात आद्रतेचे प्रमाणदेखील जास्त असल्याने नागरिकांना असह्य उकाडा जाणवत आहे. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक अक्षरशः घामाघूम होत आहेत. या बदललेल्या वातावरणामुळे शरीरातील पाणी कमी होऊन आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतत पाणी प्यावे.

ऑक्टोबर महिना हा सहसा थोडाफार उष्णतेचा समजला जातो. हा मान्सून संपल्यानंतर आणि  हिवाळ्यापूर्वी येणार महिना असून,  हा महिना  जळगावकरणांना असहनीय होत आहे.  ऑक्टोबर महिना हा त्रुतु परिवर्तनाचा काळ असून, यात हवेमध्ये उष्णता आणि दमतपणाचे प्रमाण वाढले आहे. हे वातावरण विषाणूच्या वाढीसाठी पोषक असते असे डॉक्टरनाकडून सांगण्यात आले.

ऑक्टोबर महिन्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असतो. यामळे शरीरावर देखील त्याचा परिणाम होतो, उष्ण व दमट हवामानामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन, डिहाड्रेशन होते, यश विषाणूजन्य आजारदेखील वाढतात. अशा काळात शरीरातील पाणी कमी होणार नाही याची काळजी घ्यावी.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button