⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | ‘ते’ पत्र ग्राह्य धरू नये; भगत बालाणी यांनी दिले विभागीय आयुक्तांना ३३ नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र

‘ते’ पत्र ग्राह्य धरू नये; भगत बालाणी यांनी दिले विभागीय आयुक्तांना ३३ नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । भाजपच्या बंडखाेर नगरसेवकांनी मीटिंग घेतल्याचा बनाव करून भाजप गटनेता व उपगटनेता बदलाबाबतचे पत्र महापाैर यांना दिले व महापाैरांनी प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या कार्यालयाकडे पाठवले आहे; पण ते ग्राह्य धरू नये असे ३३ नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र भगत बालाणी यांनी १ ऑक्टोबर राेजी विभागीय आयुक्तांना दिले आहे. मात्र, त्यांनी हे पत्र साेमवारी माध्यमांना दिले.

बालाणी यांनी दिलेल्या पत्रात, जळगाव महापालिकेत भाजपचे अधिकृत गटनेता म्हणूनच माझी अर्थात भगतराम रावलमल बालाणी व उपगटनेता म्हणून राजेंद्र झिपरू पाटील यांनाच अधिकृत धरण्यात यावे. मनपा आयुक्तांना गटनेता व उपगटनेता मान्यतेबाबत कुठलाही अधिकार नाही. जळगाव मगनगरपालिकेच्या महापाैर, उपमहापाैर निवडीच्यावेळी बंडखाेरी करून २७ नगरसेवकांनी भाजपच्या महापाैर व उपमहापाैर यांना मतदान न करता शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करून पक्षादेश झुगारून मतदान केले आहे. याबाबत आपल्याकडे या २७ नगरसेवकांच्या विराेधात अपात्रतेचे अपिल दाखल आहे. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या बंडखाेर नगरसेवकांनी मीटिंग घेतल्याचा बनाव करून भाजप गटनेता व उपगटनेता बदलाबाबतचे पत्र महापाैर यांना दिले व महापाैरांनी प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या कार्यालयाकडे पाठवले आहे; पण ते ग्राह्य धरू नये, असे नमूद केलेले आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.