जळगाव जिल्ह्यातील मजेशीर शब्द, जे ऐकून तुम्ही खळखळून हसाल..!
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील भाषेला काहीसा अहिराणी भाषेचा टच असला तरी जळगावच्या भाषेचे आपले एक वेगळेपण देखील आहे. जळगावात वापरले जाणारे काही शब्द प्रचंड मजेशीर असून जिल्ह्याबाहेरील बऱ्याच व्यक्तींना त्या शब्दांचा अर्थ देखील कळत नाही. जळगाव लाईव्हच्या माध्यमातून आम्ही काही शब्द आपल्या वाचकांसाठी देत आहोत. आपण देखील कमेंटमध्ये आणखी भर टाकू शकतात.
शब्द खालीलप्रमाणे.. कंसात मूळ शब्दोच्चार,
ल्हिव (लिहीने), बयगुन्हं (पातेलं), चिच्चा (चींच), चीचोरी (चिंचेच्या बिया), गोरा (वासरू), शिलगव (पेटव), च्या (चहा), वझ (ओझे), गबस (गप्प बस), जनावर (साप), कवासनं (केव्हापासुन), झगड (भांडण), इचार (विचारणे), निवद (नैवेद्य), हान/चमकाड (मारणे), डांग (फांदी), लज्गरी (लक्जरी बस), झाडनी (झाडू), वयका बर (ओळखा पाहू), यादनी (आठवेना), पयाड (पळव), रंगात (रक्त), गूच्चूप (शांततेत), ढोपार फुडीन (कोपरे फोडीन), धाकला (लहान), बानट (वेडपट), इतलूस (थोडे), कुढी (कुठे), तढी (तिथे), या पाइले (यावेळी), गयरं (खूप), ट्याक्टर (ट्रँक्टर), आढी (इथे), आईतवारी (रविवार), सोमार (सोमवार), फफूटा (धूळ), पोया (पोळ्या), डोल (मोठी बादली), घी ये (घेऊन ये), दी ये (देऊन ये), फफ्फटी (मोटार सायकल) असे काही शब्द नेहमी वापरले जातात.