आ.किशोर पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; केली ‘ही’ मागणी
पाचोरा-भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सप्टेंबर 2019 मधे पश्चिम महाराष्ट्रसाठी देण्यात आलेल्या एनआरएफ मदतीच्या निकषाच्या तिन पट मदत द्यावी अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन केली. त्यांनी याबाबत सकारात्मकता दाखविल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले.
गेल्या महीन्यात पाचोरा-भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने खरीप हंगाम पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. कापुस, मका, सोयाबीन, मुंग, उडीद सर्व पिक पाण्यात बुडाली आहे. त्यामुळे शेतकर्याना खरीप हंगामातुन खर्च ही निघण्यासारखी परीस्थीती नाही. याबाबत आमदार कीशोर पाटील यांनी फेसबुक लाईव्ह वरून शेतकऱ्यांशी संवाद साधुन शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा करून त्यांना आश्वास्थ करत मुख्यमंत्र्यांना भेटून दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करत मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली होती.
त्या पार्श्वभूमीवर आज त्यानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुबंईत भेट घेऊन शेतकऱ्यांची कैफीयत त्याच्यांकडे मांडली. दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून दिलासा देण्यासाठी आणि रब्बी पेरणीसाठी तत्काळ भरीव मदत देण्याची मागणी केली. शासनाने सप्टेंबर 2019 ला पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यासाठी खास बाब म्हणुन एनआरएफ च्या निकषाच्या तिन पट मतद दिली होती. त्याच धर्तीवर पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत द्यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्याकडे केली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.
याशिवाय आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचीही भेट घेतली. त्याच्यांकडे त्यांनी ओला दुष्काळाची आणि भरीव मदतीची मागणी केली. तर विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याबाबत आग्रही भुमिका मांडली. याशिवाय त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील , पाचोऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते. दरम्यान उद्या आमदार कीशोर पाटील हे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन तत्काळ भरपाई मिळण्याबाबत आग्रही भुमिका मांडणार असल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले. याशिवाय राज्याच्या मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची ही भेट घेऊन निवेदन देणार आहेत.
पाचोरा-भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याबाबत आपण आग्रही आहोत.
-किशोर पाटील,
आमदार पाचोरा-भडगाव