जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । डॉक्टर नेहमी कागदावर गोळ्या, औषधीच लिहितात. सोशल मीडियात देखील ते फारसे वेगळे लिखाण करीत नाही. जळगावातील सध्याची परिस्थिती इतकी खालावलेली असून डॉ.विलास भोळे यांनी चक्क कविताच लिहून ती सर्वांसमोर मांडली आहे.
प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ असलेले डॉ.विलास भोळे हा शीघ्र कवी देखील असून त्यांनी एक अतिशय मार्मिक आणि जळगाव शहरातील सध्याच्या परिस्थितीचे वर्णन मांडणारी कविता लिहिली आहे.
वाचा अशी आहे कविता…
राजकारण जळगाव
जनता इथे सहनशील
विकास मार्गे शिथिल
रस्तेनाले एकच येथील
कर शुल्के तरी वाढतील
नेते फक्त भ्रष्ट नकली
पोट घरे भरती सगळी
एकमेका कुरघोडी फ़सली
पुरावे पेटीत यांच्या सडली
पहाट विकासी जेव्हा येईल
जनी स्वप्ने तेव्हा थांबतील
शुद्धी राजकारणी होईल
जळगाव पुनर्जन्म घेईल ?
शीघ्रकवी : डॉ. विलास भोळे