गुन्हेजळगाव जिल्हा
पाचोरा-जळगाव रस्त्यावर भरधाव चारचाकीचे टायर फुटून अपघात
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा शहराकडून जळगावकडे येत असलेल्या चारचाकीचे मागील चाक फुटल्याने चारचाकी थेट शेतात झाडावर धडकली. सुदैवाने चारचाकी मागील बाजूने धडकल्याने जिवीतहानी टळली आहे.
पाचोरा नगरपालिकेतील कर्मचारी किशोर पाटील हे सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चारचाकी क्रमांक एमएच.१९.एपी.२७२८ ने जळगावकडे येत होते. हडसन ते नांद्रे दरम्यान असलेल्या लक्ष्मी ऍग्रोच्या पुढे अचानक त्यांच्या चारचाकीचे मागील टायर फुटले. चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील झाडावर जाऊन धडकली.
चारचाकी मागील बाजूने धडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. सकाळी रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात कोणतीही नोंद नव्हती.