ईडीच्या कारवायांवर गुलाबराव पाटलांचा टोला ; म्हणाले…
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । ईडीकडून होत असलेल्या कारवायांवर जळगावचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आज ईडीचा वापर होत आहे. मात्र ब्रह्मास्त्र हे वारंवार वापरता कामा नये याचे पुराणकालापासून दाखले आहेत. याच प्रमाणे ईडचे ब्रह्मास्त्र वापरले की, ते बोथट होणारच !” अशा शब्दात ना.गुलाबराव पाटील टोला लगावला.
काल नाशिक येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था ‘मित्रा’ च्या नूतन इमारतीच्या व मुख्य अभियंता कार्यालयाच्या इमारतीच्या ई-उद्घाटन करण्यात आले. यानंतर गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात ईडीकडून होत असलेल्या कारवायांवर भाष्य केलं. एकनाथराव खडसे यांच्यावरील ईडी कारवाईच्या चर्चेबाबत भाष्य करतांना त्यांनी केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याची टीका देखील ना. पाटील यांनी केली.
मुख्य संसाधन केंद्र ठरणार : गुलाबराव पाटील
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, देशात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत मीत्रा संस्था मुख्य संसाधन केंद्र ठरणार आहे. 2024 पर्यंत हर घर जल हे उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी तसेच पाणी पुरवठ्याच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्याकरीता या प्रशिक्षण संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यशदा प्रशिक्षण संस्थेने प्रमाणेच अनेक आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी मीत्रा प्रशिक्षण संस्था देशपातळीवर नाव लौकिक मिळवेल, असा विश्वास मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.