सुप्रीम कॉलनीतील २८ वर्षीय तरुणी २१ दिवसांपासून बेपत्ता
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात असलेल्या जळगाव काटा भागात राहणारी २८ वर्षीय मनोरुग्ण तरुणी गेल्या २१ दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे.
सुप्रीम कॉलनी परिसरात असलेल्या उस्मानिया मस्जिदजवळ जुबेदाबी शेख या परिवारासह राहतात. जुबेदा यांची मुलगी रशिदाबी शेख वय-२८ ही मनोरुग्ण आहे. तिच्या सासरची मंडळी ती मनोरुग्ण असल्याने तिला नांदवत नव्हते म्हणून ती आईकडेच राहत होती. ती मनोरुग्ण असल्याने जळगाव शहरात दिवसभर भीक मागून रात्री उशिरा घरी येत होती.
दि.९ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता कुणालाही काहीही न सांगता ती घरातून गेली असता रात्री घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने दि.१६ रोजी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. २१ दिवस होऊन देखील ती अद्याप घरी परतलेली नाही. राशिदा शरीराने मजबूत असून आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. रंगाने सावळी असून पाठीवर शाळेची काळ्या रंगाची बॅग लावलेली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.