महापालिकेने बजावल्या ३० हजार मालमत्ताधारकांना नोटीस
जळगाव लाईव्ह न्युज | ३० सप्टेंबर २०२१ | महापालिकेने केलेल्या फेरमूल्यांकन अंतर ५५ हजार मालमत्तांची वाढ झाली आहे. त्यादृष्टीने मनपाकडून प्रभाग समिती मधील ४० कॉलोनी मधील ३० हजार मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
मनपाकडून या मालमत्ता धारकांकडून कर मूल्यांकनात संदर्भात हरकती मागवण्यात येणार आहेत याबाबत सोनवणे घेतल्यानंतर संबंधित यांना वाढीव कराचे बिल दिले जाणार आहे.
मनपाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता करात वाढीसाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मनपा स्तरावर प्रयत्न सुरू होते. जळगाव शहरात एक लाख 16 हजार मालमत्तांचे नोंद करण्यात आली आहे त्यात सुमारे 55 हजार मालमत्तांचा बांधकामात बदल झाल्याची आढळून आले आहे.
ज्यामध्ये सर्वाधिक मालमत्ता या प्रभाग समिती क्रमांक एक मध्ये 30000 मालमत्ता चा समावेश आहे संबंधित हरकती मागविण्यात आल्या आहेत 21 दिवसात हरकत न दाखल झाल्यास आकारणी निश्चितपणे केली जाणार आहे.