मेहरुण परिसरात ‘एलईडी’ लाईटची उभारणी
जळगाव लाईव्ह न्यूज | २७ सप्टेंबर २०२१ |शहरातील मेहरुण परिसरात प्रभाग क्र. 15 मध्ये महापौर .जयश्री सुनिल महाजन यांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवार, दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी ‘एलईडी’ लाईट उभारणी करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्यासह त्यांच्या सहकारी नगरसेवकांना धन्यवाद दिले आहेत.
पालकमंत्री मा.ना.श्री. गुलाबराव पाटील यांनी ‘डीपीडीसी’मधील नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना 2020-21 अंतर्गत नऊ मीटर 21 नगर साडेबारा मीटर तिचे दोन नगचे हायमास्ट व मिनी हायमास्ट उभारणीसाठी सोळा लाख रुपये मंजूर केले होते. त्यातून या कामाची उभारणी करण्यात आली. यामध्ये भवानी मंदिर, महादेव मंदिरापुढे, मदरसा गल्ली कोपरा मेन रोड, दिलीप भोईंच्या दुकानाजवळ, शहावलिया मस्जिद, पटेल गल्ली, मिलिटरी कॅम्प दत्त मंदिराजवळ, बिलाल चौक मस्जिदसमोर, नमस्कार प्लायवूड, सुतार डीपी, गुलाबबाबा कॉलनी गणपती मंदिर, इच्छादेवी मंदिर, रत्नाकर नर्सरी, सुभाष डीपी, पाण्याचा हौद, के मार्ट, मरिमाता मंदिर, व्यास मेडिकलसमोर, जय भवानी नगर, महादेव मंदिर चारी, मोहमद्दीया नगर आदी ठिकाणी ‘एलईडी’ लाईटची उभारणी करण्यात आली.
यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक, सलमान खाटीक, अनिल सोनवणे, मक्तेदार सत्यम इलेक्ट्रिकलचे मयूर चौधरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.