⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | शिवसेनेला मतदान करण भोवल ; एमआयएमचे तीन नगरसेवक निलंबित

शिवसेनेला मतदान करण भोवल ; एमआयएमचे तीन नगरसेवक निलंबित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनच्या (एमआयएम) तीन नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केल्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. त्यामुळे त्या तीन नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द केल्याची माहिती एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती न देता तेथील नगरसेवक व जिल्हाध्यक्षांनी परस्पर निर्णय घेतला. जळगावचे जिल्हाध्यक्ष जिया अहमद बागवान यांचा नगरसेवक भाऊ रियाज अहेमद बागवान, सईदा युसूफ शेख, सुन्नाबी राजू देशमुख यांनी शिवसेना उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे त्यांना नोटीस बजावून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

२१ मार्चपर्यंत त्यांना बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सय्यद इम्तियाज जलील व पक्षप्रमुख बॅ.असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे पाठवण्यात येईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.