जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील गाळण येथील सासर असलेल्या विवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. पुनम नामदेव पाटील असे मृत विवाहीतेचे नाव असून याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील अंतुर्ली खु” येथील पुनम नामदेव पाटील हिचा विवाह गेल्या १० वर्षांपूर्वी गाळण ता. पाचोरा येथील संदिप सोनवणे यांचेशी झाला होता. पती संदिप सोनवणे हे शेती सोबतच लाईट फिटींगचे काम करुन आपल्या व परिवाचा उदरनिर्वाह चालवत होते. दरम्यान आज दि. २१ रोजी पती संदिप सोनवणे हे बाहेरगावी लाईट फिटींगचे काम करण्यासाठी गेले असता दुपारी २:३० वाजेच्या सुमारास पुनम ही व त्यांचा ७ वर्षांचा मुलगा भाविक हे घरी असतांना पुनम हिने झोक्याच्या दोरीला गळफास घेऊन आमहत्या केली.
सदरचा प्रकार मुलगा भाविक याचे लक्षात येताच त्यांना शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली असता एकच खळबळ उडाली. पुनम हिला तात्काळ पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी पुनम हिस मृत घोषित केले. मयत पुनम संदिप सोनवणे हिच्या पाश्चात्य पती, एक मुलगी, एक मुलगा, सासु, सासरे, जेठ असा परिवार आहे. मयत पुनम हिने आत्महत्या का केली ? याचे नेमके कारण समजू शकले नाही. पुनम सोनवणे हिच्या अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील हे करत आहे.