अबब… शहरात एक लाखाहून अधिक घरांमध्ये झाली मच्छरांची फवारणी
जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । शहरात डेंग्यूने उच्छाद मांडला आहे. अशा वेळेस मनपा प्रशासन झोपले आहे का? असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी उपस्थित केला. यावेळी आरोग्य अधिकारी विकास पाटील यांनी उत्तर देताना ते म्हणाले की, शहरातील चक्क १ लाख १६ हजार घरांमध्ये मच्छर मारण्यासाठी औषधांची फवारणी झाली आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांना तुम्ही स्वतः किती ठिकाणी उपस्थित होतात असा प्रश्न विचारले असता त्यांनी मी केवळ शंभर घरांसाठी उपस्थित होतो असे उत्तर त्यांनी दिले.
आरोग्य विभागाने सांगितले की, एखाद्या घरातील व्यक्तीला डेंग्यू झाला तरच त्या परिसरातील इतर घरांच्या ठिकाणी जाऊन डेंग्यूच्या मच्छरांना मारणाऱ्या औषधाची फवारणी करण्यात येणार आहे.
साहेब तुमच्या पाया पडतो पण काम करा
आरोग्य विभागाकडून होत असलेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत असंतुष्ट नगरसेवकांनी अखेर पाटील साहेब, तुमच्या पाया पडतो मात्र काम करा अशी विनवणी त्यांना केली.