तरवाडे पेठेत 11 हजारांची देशी-विदेशी दारू जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे अवैद्य दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. आणि चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी माहिती मिळताच त्या ठिकाणी छापा टाकून 11 हजार रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस काल रविवारी सकाळी 11:30 वाजता वाघळी परिसरात गस्तीवर होते. या गस्तीवर असताना तरवाडे पेठ येथे बसस्थानकाजवळ देशी-विदेशी दारू ची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली. आणि पोलिसांनी ताबडतोब तेथे धाड टाकली. आणि या धाडीमध्ये 11 हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरगडे पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, बिभीशन सांगळे यांनी रविवारी सकाळी ही धाड टाकली. या धाडीमध्ये देशी-विदेशी दारूच्या मोठ्या प्रमाणावर बाटल्या आढळून आल्या. एकूण 11 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान यावेळी संजय महादू चौधरी (51,राहणार तरवाडे पेठ चाळीसगाव) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आणि संबंधित आरोपीवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.