⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | प्रत्यकाने पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी प्रयत्न करावा देवलाल पाटील यांचे आवाहन

प्रत्यकाने पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी प्रयत्न करावा देवलाल पाटील यांचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । पर्यावरणाचा ऱ्हास होत असून सण उत्सव साजरे करतांना प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल कायम टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जेष्ठ पत्रकार देवलाल पाटील यांनी केले. येथील नगरपालिकेतर्फे तुरटीपासून बनविलेल्या गणेश मूर्तींच्या वितरणप्रसंगी त्यांनी अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना आवाहन केले.

पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी गणेशोत्सवात पर्यावरण पूरक मूर्तींची स्थापना करण्याची संकल्पना दोन वर्षांपूर्वी राबविली होती. त्यांची बदली झाल्यावरही नगराध्यक्ष दारा मोहम्मद व प्रभारी मुख्याधिकारी किशोर चव्हाण शहरात इको फ्रेंडली गणेशोत्सवाची परंपरा पालिकेने तिसऱ्या वर्षीही कायम ठेवली आहे. कृषक समाज गणेश मंडळ, अंबिका व्यायाम शाळा, शिवाज्ञा व्यायाम शाळा, महात्मा फुले व्यायाम शाळा, हनुमान व्यायाम शाळा, नागवेल लेझीम मंडळ, आधुनिक व्यायाम शाळा, संभाजी व्यायाम शाळा, कारागीर व्यायाम शाळा, शिवराम व्यायाम शाळा, शिवदुर्ग व्यायाम शाळा, प्रताप व्यायाम शाळा , छत्रपती व्यायाम शाळा यासह शहरातील तीस सार्वजनिक गणेश मंडळांना तुरटीपासून बनविलेल्या गणेश मूर्तींचे पालिकेतर्फे वितरण करण्यात आले आहे. यावेळी कार्यालय अधीक्षक सर्फराज तडवी, एस.एम. काळे, आरोग्य निरीक्षक युवराज गोयर, अभियंता अतुल चौधरी, प्रमोद चौधरी, शिवाजी महाजन, पांडुरंग महाजन, शरद पाटील उपस्थित होते.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.