नागद ते कन्नड गौताळा घाटात दरड कोसळली
जळगाव लाईव्ह न्यूज | तुषार देशमुख | चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून अतिवृष्टी व संततधार पाऊस परिस्थितीने चाळीसगाव हुन कन्नड कडे जाणारा औट्रम घाट रस्ता, आठ ते दहा ठिकाणी दरडी कोसळल्याने हा घाट प्रवास करण्यासाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे,
ज्या प्रवाशांना अति महत्त्वाच्या कामासाठी कन्नड औरंगाबाद कडे जायचे होते ते प्रवासी चाळीसगाव नागद मार्गे गौताळा घाटातून औरंगाबाद ,सिल्लोड, कन्नड ला जात होते आज दुपारी अचानक नागद कन्नड रस्त्यावरील गौताळा घाटात मसोबा मंदिराजवळ अचानक दरड कोसळल्याने हा घाट रस्ता सुद्धा रहदारी साठी बंद झाला आहे त्यामुळे खान्देश आणि मराठवाड्याचा संपर्क पूर्णपणे बंद झाला आहे या गौताळा घाटातील दरड कोसळल्या घटनास्थळी कन्नड चे तहसीलदार वरकड साहेब पीएसआय राजपूत साहेब यांनी लागलीच भेट देऊन रस्त्यातील मलबा दूर करण्याचे आदेश दिले
या घटनास्थळी सायगव्हाण ता.कन्नड येथील ग्रामपंचायत सदस्य पप्पू पाटील हिरालाल राजपूत सचिन जैन व त्यांचे सहकारी शिवसैनिक रस्ता सुरळीत करण्याकामी मदत करीत आहे,