⁠ 
रविवार, मे 19, 2024

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील सातगाव येथे घडली. विलास ओंकार डांबरे (वय-३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सातगाव येथील विलास डांबरे यांच्यावर बँकेचे कर्ज तसेच अवकाळी पावसाने झालेले नुकसान यामुळे त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. “काळाचा फेरा काहीना चुकविता येत नाही.” अशी घटना सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील विलास ओंकार डांबरे यांच्यावर वेळ आलेली आहे.

सततच्या कर्जबाजारीपणामुळे तसेच दर वर्षी उत्पादन घटत असल्याने, विलास यांनी राहत्या घरातील मागच्या खोलीत जाऊन विष असलेल्या बाटलीतील विष प्राशन करून घेतले आणि बाटली खाली फेकताच त्यांच्या नऊ वर्षाच्या संकेत मुलाने बघितले. मुलाने आजोबाला व आई कविता यांना घटना सांगितली असता आरडाओरडा झाल्याने गल्लीतील लोक जमा झाले. विलास यास तात्काळ गाडी करून पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांना विलास डांबरे यांची प्राणज्योत मालवली.